५ फेब्रुवारी या दिवशी अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेचे ९ कार्यकर्त्यांनी विज्ञान आश्रम ला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी विकिपीडियाचे काम तसेच स्कॅनिंग याबद्दल माहिती  समजून घेतली.

     27 फेब्रुवारी या दिवशी कोमल संभुदास आणि हर्षदा राऊत यांनी मिळून राष्ट्रीय मराठी भाषा दिनानिमित्त आश्रममध्ये कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये त्यांनी मराठी  भाषा याबद्दल आश्रम मधील मुलांना मार्गदर्शन केले. तसेच इतर भाषांचा वापर न करता मराठी भाषेत नाटक सादर केले व कार्यक्रमाच्या शेवटी इतर भाषांबरोबरच मराठी भाषा आपल्यासाठी किती महत्वाची आहे ते समजून सांगितले. या कार्यक्रमत मराठी विकिपीडियाशी ओळख आणि कसे काम करतात याबद्दल माहिती दिली.

     २८ फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान TTT 2020 या कार्यक्रमाचे आयोजन CIS-A2K यांनी केले. या कार्यक्रमासाठी विज्ञान आश्रमतर्फे प्रियांका जाधव हिने सहभाग घेतला. या कार्यक्रमामध्ये wikivayage, Wikisource, wikidata, Copyright, Documentation  या संबधित मार्गदर्शन मिळाले.

     विज्ञान आश्रम मध्ये फोटोथोन चे नियोजन करण्यात आले. हे फोटोथोन २९ फेब्रुवारी ला घेण्यात आला. या कार्यशाळेला पाबळच्या जवळपासच्या  मुलीं व मुलांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत विज्ञान आश्रमातील फॅब लॅब प्रयोगशाळेचे फोटोथॉन घेण्यात आले.

अधिक माहितीसाठी पुढील माहिती पाहावी :

विज्ञान आश्रम डिजीटल फॅब्रीकेशन लॅब(फॅब लॅब )फोटोथॉन

Photothon at Vigyan Ashram Fab Lab

तसेच काही विषयावरती लेख तयार केले :

लोकमान्य टिळकांचे 3 खंड स्कॅनिंग सुरु आहे. तसेच नरहर कुरूंदकर यांचे 13 पुस्तकांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. त्यांची तपासणी सुरु आहे.

समग्र लोकमान्य टिळकांचे खंड आणि नरहर कुरूंदकर यांचे एकूण१५०० पाने स्कॅन करून झाले.

Ocr हे तपासून झालेले पुस्तक आणि सुबोध कुलकर्णी सर यांनी सांगितल्यावर ही प्रकिया केली जाते. यानुसार राजगुरुनगर ग्रंथालयाच्या पुस्तकांचे Ocr सुरु आहे.

राजगुरुनगर ग्रंथालयाचे १  पुस्तकांचेOCR: